सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन शिष्टमंडळाशी बैठक
सातारा: सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. समीर शेख यांची दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशनच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि बंदोबस्त प्रक्रियेतील पोलिस दलासोबत सहकार्य करण्यासाठी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
बैठकीदरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दक्ष नागरिक पोलीस मित्रांसोबत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. भरोसा सेलचे पोलीस उपनिरीक्षक मा. फाळके यांना या कार्यवाहीची जबाबदारी देण्यात आली आहे. एसपी साहेबांनी दक्ष नागरिक पोलीस मित्र आणि पोलीस दलाने एकत्रितपणे काम करावे असे निर्देश दिले आहेत, यासाठी लवकरच एक परिपत्रक जारी केले जाईल.
या बैठकीत शिष्टमंडळात उपस्थित असलेले सदस्य संस्थापक अध्यक्ष मा. राजेश भोसले, केंद्रीय उपमहासंचालक दत्तात्रय जाधव, मार्गदर्शक व मी नागरिक फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. विद्याधर गायकवाड, मा. अमित पाटील, कराड तालुका अध्यक्ष मा.महेश भोसले,मा. ईश्वर कारंडे, तालुका मुख्य निरीक्षिका सौ. साधना राजमाने, सौ. अनुराधा पाटील, सातारा शहर पोलीस मित्र सौ. कोमल कांबळे, सौ. रोहिणी चव्हाण, सौ. कोमल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
बैठकीदरम्यान, दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन व मी नागरिक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम, महिला सुरक्षा, सुरक्षित बालक संवाद यात्रा अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. एसपी समीर शेख यांनी या उपक्रमांना सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
सातारा जिल्ह्यातील पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी दक्ष नागरिक पोलीस मित्र सातारा जिल्हा कमिटी सज्ज असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.