मायमराठी चॅनलचे संपादक संतोष (सनी) शिंदे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड
पिंपरी चिंचवड येथे डिजिटल मिडिया परिषदेची कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी मायमराठी चॅनलचे संपादक संतोष (सनी) शिंदे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले.
सातारची पत्रकारिता देशाला मार्गदर्शन देणारी ठरली आहे. राज्यात सातारचा नावलौकीक दबदबा आहे. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष दादा पाटणे, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संघटनेची वाटचाल अत्यंत शिस्तबद्ध रित्या सूरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात डिजिटल मीडिया परिषदेला नावलौकिक आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सनी शिंदे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे
बदलत्या काळानुसार बातम्यांचे स्त्रोत आणि माध्यम बदलत असून, ऑनलाइन डिजिटल मीडियाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व समाजात कानाकोपऱ्यात बातमीची सत्यता आणि वेगाने माहिती पोहोचण्याच्या दृष्टीने पोर्टलधारक, यूट्यूब चॅनेल सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. पंधरा वर्षाहून अधिक काळ सनी शिंदे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संघटना बांधणी प्रयत्नशील होते. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काम करत असताना जर्नालिस्ट ला येणारे प्रॉब्लेम शासन दरबारी मांडण्यासाठी, पत्रकारांच्या वर होणारे हल्ले, याबाबत त्यांची एकजूट होण्यासाठी सनी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून आणि मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या.