Home » राज्य » मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

मुंबई -महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात काहीही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ.”

उद्धव ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य आहे राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबतच्या युतीबद्दलचं. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जातं. तशा चर्चाही रंगतात.मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युती संबंधी पत्रकारांनी विचारलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बघु, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’. उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात या प्रश्नाच उत्तर दिलं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket