Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » अजितदादा, मकरंदआबांना मंत्री करा!

अजितदादा, मकरंदआबांना मंत्री करा!

अजितदादा, मकरंदआबांना मंत्री करा!

साथ दिली, आता मंत्रिपद द्या

सातारा ( प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आ. मकरंद पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली. गत सरकारमध्ये त्यांना मंत्री करता आले नाही. मात्र, आता अजितदादांनी मकरंदआबांना मंत्री करा, अशी मागणी जिल्हावासीय करत आहेत.

सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात स्व. लक्ष्मणराव पाटील व कुटुंबियांची नाव अग्रभागी राहते. जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व लक्ष्मणराव पाटील यांनी केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा कायमस्वरुपी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिल, यासाठी प्रयत्न केले. त्यांचा वारसा आ. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील यांनी पेलला आहे. 

वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघात मकरंद पाटील यांनी विजयाचा चौकार मारला आहे. शिवाय, किसन वीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा साखर कारखान्याची जबाबदारी पेलण्याचे काम हे बंधू करत आहेत. दोन्ही कारखाने अडचणीत असतानाही त्यांनी निवडणूक लढवून हे कारखाने ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे कारखाने वाचवण्यासाठी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. 

या दरम्यान शरद पवार आणि अजित पवारांनी वेगवेगळी राजकीय मार्ग स्विकारले. अजित पवारांनी भाजप, शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी अजित पवारांसोबत जायचे की नाही, यावर ते अडकले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच दोन्ही साखर कारखाने वाचवण्यासाठी त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

मकरंद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा दमदार यश मिळविले आहे. सातारा जिल्ह्याची जबाबदारी सांभळण्यासाठी ते सक्षम असून, त्यांना अजित पवारांनी कॅबिनेट मंत्रिपद देवून ताकद देण्याची गरज आहे. 

गतवेळी मंत्रिपद राहिले

अजित पवार हे मकरंद पाटलांना कॅबिनेट मंत्री करणार होते. मात्र, तिन्ही पक्षातील विविध अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडत गेला. शेवटपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आता मात्र मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांनी आ. पाटील यांना कॅबिनेट मंत्री करुन जनसामान्यांत मिसळणारा, सर्वमान्य लोकप्रतिनिधीला संधी द्यावी. 

काकांनी संधी सार्थ केली

लोकसभा निवडणुकीवेळी अजितदादांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील यांना खासदार करण्याचा शब्द दिला. तो शब्द दादांनी पाळला. दादांनी दिलेली संधी काकांनी याच विधानसभा निवडणुकीत वाईबरोबर फलटण येथे घडाळ्याच्या चिन्हावर पक्षाच्या दोन जागा विजयी करुन सार्थ करुन दाखविली. त्याचबरोबर स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे समर्थक, कार्यकर्ते, स्वत:चे कार्यकर्ते, महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांनी महायुतीच्या आठही जागा विजयी होतील, यासाठी जीवाचे रान केले. त्याला सर्वसमावेशक यशही आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket