Home » ठळक बातम्या » माजी उमेदवारी सर्वसामान्य जनतेसाठी- पुरुषोत्तम जाधव

माजी उमेदवारी सर्वसामान्य जनतेसाठी- पुरुषोत्तम जाधव

माजी उमेदवारी सर्वसामान्य जनतेसाठी- पुरुषोत्तम जाधव

सातारा -वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिरवळ येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी दाखवलेली गर्दी आणि त्यांच्या उत्साहामुळे मला निवडणूक लढण्यास नवे बळ मिळाले आहे असे पुरुषोत्तम जाधव म्हणाले.

आपल्या विचारधारेवर ठाम असणाऱ्या या कार्यकर्त्यांसोबत पुढे जाण्याची ऊर्जा मिळाल्याने मी अधिक आत्मविश्वासाने काम करण्यास सज्ज आहे.आपला मतदारसंघ अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी आपण एकत्र राहून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू माझी उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेसाठी असून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात निश्चितच बदल होणार असून सुज्ञ जनता घराणेशाही मोडीत काढणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा जिल्ह्यात शिवसेना(शिंदे गट) वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले असून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात कोट्यावधीची  विकास कामेही केली आहेत. पक्ष संघटनेसाठी महत्त्वपूर्ण वेळ देऊन ही पुरुषोत्तम जाधव यांच्यावर अन्याय झाल्या असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाई विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव अपक्ष निवडणूक लढवणार असून खंडाळा तालुक्यातील जनता त्यांच्याबरोबर असल्याचे दिसून येत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 17 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket