Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » भोसे खिंड पाचगणी महाबळेश्वर रोड येथे मधुसागरच्या दर्जेदार प्रॉडक्टचे आउटलेट सुरू

भोसे खिंड पाचगणी महाबळेश्वर रोड येथे मधुसागरच्या दर्जेदार प्रॉडक्टचे आउटलेट सुरू 

भोसे खिंड पाचगणी महाबळेश्वर रोड येथे मधुसागरच्या दर्जेदार प्रॉडक्टचे आउटलेट सुरू 

प्रतिनिधी -महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी लि महाबळेश्वर या संस्थेचे भोसे खिंड महाबळेश्वर येथे मधुसागर आउटलेट सुरू करण्यात आलेले आहे. संस्थेची स्थापना सन 1955 साली झाली असून सभासद शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था कार्यरत आहे. संस्था अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. तरी संस्थेने सोमवार दिनांक 25-11- 2024 रोजी भोसे खिंड महाबळेश्वर येथे संस्थेचे आउटलेट सुरू करण्यात आलेले आहे. संस्थेचे विद्यमान संचालक मा. श्री. यशवंतजी घाडगे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

मधुसागर ही महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध संस्था आहे. जी मधाच्या शुद्धतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरला आलेला पर्यटक मधुसागर चा मध, जॅम, जेली आणि सिरपशिवाय खरेदी केल्याशिवाय घरी परतत नाही. मधुसागरचा मध 100% नैसर्गिक आहे त्यात कोणतेही पदार्थ, संरक्षक, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वाद नसतात, त्याचा आयुर्वेदात औषधी मूल्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

 भोसेखिंड, महाबळेश्वर पांचगणी रोड येथे मधुसागरच्या आउटलेटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चेअरमन संजय पारठे, व्हाईस चेअरमन संपत जाधव, संजय शेलार, राजेश सपकाळ, प्रवीण रिंगे, मनीषाताई पारठे, लक्ष्मीबाई सपकाळ, व्यवस्थापक दीपक पवार, उपव्यवस्थापक विशाल जाधव,जाम विभाग प्रमुख उमा वागदरे, श्रीरंग कारंडे, पांडुरंग राजपुरे, दानवले गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

फळांच्या शुद्ध रसापासुन निर्मित जाम आंबा, आवळा, मिक्सफुट,स्ट्रॉबेरी, पायनॅपल, मलबेरी,क्रश व सिरप ऑरेंज,आंबा, लिंबू, कोकम,जांभूळ, स्ट्रॉबेरी, गुलाब केशर, लिची,आवळा, जिंजर, पायनॅपल, खस (वाळा)त्याचबरोबर संस्थेने हळद व गुळाचे विविध प्रकार अशा प्रकारची नाविन्यपूर्ण उत्पादने तयार केली आहेत.

गुलकंद, शुगर क्युब, जेली चॉकलेट,मधाचे चॉकलेट,मधातला आवळा, मधुमेही साठी उपयुक्त जांभूळ,आवळा ज्यूस या फॅक्टरी आउटलेट मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.पर्यटकांच्या सोयीसाठी सुरूर, वेळे, वाई येते मधुसागर चे अद्ययावत आऊटलेट लवकरच सुरू होणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन चेअरमन संजय पारठे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 18 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket