साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राजकारण » लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!

लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!

“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!

प्रतिनिधी -बारामतीकरांनो लोकसभा निडणुकीत तुम्ही शरद पवार साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच राज्यातील जनतेने विकासासाठी महायुतीला मतदान करावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. ते गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहे. जास्तीत लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज बारामतीत अशाच एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी मतदारांना लोकसभेप्रमाणे भावनिक होऊन मतदान न करण्याचं आवाहन केलं.

अजित पवार म्हणाले, “लोकसभेला तुम्ही बोलत नव्हता, पण तुम्ही मनातून ठरवलं होतं. त्यावेळी तुमच्यामध्ये एक अंडरकरंट होता. तेव्हा काहीजण म्हणत होते, ताई निवडणुकीत पडल्या तर साहेबांना या वयात कसं वाटेल? त्यामुळे तुम्ही तेव्हा ताईला मतदान केलं. पण आता विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खूश केलं, आता विधानसभा निवडणुकीत मला मतदान करून खूश करा.”

पुढे बोलताना, “लोकसभा निवडणुकीत तुम्ही दिलेला निकाल मी स्वीकारला. मात्र आता आपल्या भागाच्या विकासासाठी तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला तुम्ही सुप्रिया सुळे यांना निवडणूक दिलं. आता विधानसभेला घडाळासमोरील बटन दाबून मला विजयी करा. ते त्यांच्या पद्धतीने तालुक्याचा विकास करतील, मी माझ्या पद्धतीने विकास करेन”, अशीही प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. विशेष म्हणजे अजित पवारांच्या मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना तब्बल ४८ हजार मतं मिळाली होती. त्यामुळे बारामतीतील जनता शरद पवार यांच्या बाजुने असल्याचे सिद्ध झालं होतं. त्यानंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुलीही दिली होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket