‘लोकमंगल’ कृतिशील शिक्षणाची सुंदर शाळा – मोहन चौबळ
स्वच्छतागृह उद्घाटन व क्रीडा साहित्य वितरण
सातारा- विद्यार्थ्यांच्या अध्यायनास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम व कृतिशील शिक्षण दिले जाते. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते म्हणून लोकमंगल कृतिशील शिक्षणाची सुंदर शाळा आहे असे प्रतिपादन स्प्रिंग कॅम्पुटिंग टेक्नोलॉजीज, पुणे चे मुख्यकार्यकारी अधिकारी मोहन चौबळ यांनी केले.
येशील लोकमंगल हायस्कूल नागेवाडी-कुशी विद्यालयात आयोजित स्वच्छतागृह उद्घाटन व क्रीडा साहित्य वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणूने बोलत होते. यावेळी एच. आर. अनुश्री चौबळ,लोकमंगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, सचिव शिल्पा चिटणीस, नागेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रूपाली सावंत , भगवान सावंत, अविनाश सावंत, शाहूराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहन चौबळ म्हणाले ग्रामीण भागातील विदयार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतो. त्याला परिस्थितीची जाण असणे गरजचे असते. मुले चांगली कामे करतात. शाळेतील विविध उपक्रम पाहून आनंद वाटतो. चांगले काम करतात. मुलांना गावा बाहेरचे व शाळेबाहेरचे जग बघायला मिळावे ही शिक्षकांची धडपड आहे.विविध स्पर्धेत सहभाग घ्या. तुमची प्रगती होवू दे.
शिरीष चिटणीस म्हणाले, बदलत्या सामाजिक परिस्थितीत विशेषतः मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. विद्यालयात विविध उपक्रमातून विदर्थ्यांच्या कलागुणांना संधी दिली जाते. वाचन, लेखन, चिंतन गरजेचे विध्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा पुरवण्याचे काम केले जात आहे.
स्प्रिंग कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज, पुणे यांचाकडून स्वच्छताग्रहासाठी ४,००००० (चार लाख रुपये) संगीत व क्रीडा साहित्यासाठी ४५००० रुपये व साठ बेंच यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.
याप्रसंगी विध्यार्थ्यांनी तयार केलेले कृतिकार्य व उपक्रम, हस्तलिखित, हस्तकला, चित्रकला, कात्रणसंग्रह,सुलेखन यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ‘इन्सपायर’ हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत जमदाडे यांनी केले तर मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत जाधव, भगवान जाधव, अर्चना सावंत, राहुल घोडके, दिलीप सावंत, रमेश महामुलकर यांनी परिश्रम घेतले.
