Post Views: 43
कोयनेत आज अखेर 32 Tmc पाणीसाठा
पाटण- जिल्ह्याच्या पश्चिमभागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 29 तर नवजाला 47 आणि महाबळेश्वरमध्ये 73 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 33.84 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 32.15 टक्के भरले आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील उरमोडी, कणेर, धोम, महू हातगेघर, तारळे या धरणातील पाणीसाठा अत्यल्प असून शेतकरी वर्गास पावसाची चिंता लागून राहिली आहे.
