कोरेगावात दि.२ रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा निर्धार मेळावा वाढदिवसानानिमित्त रमेश उबळेंचा सत्कार
कोरेगाव दि.(प्रतिनिधी)पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा निर्धार मेळावा तसेच पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार समारंभ संयुक्त कार्यक्रम दि.२ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी कोरेगाव येथील शिवरत्न मंगल कार्यालयात आयोजित केला आहे.
हा मेळावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून यावेळी कार्यध्यक्ष जयदीपभाई कवाडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे , युवा जिल्हाध्यक्ष पलाश गायकवाड,नितीन रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष,महेश रणदिवे युवा उपजिल्हाध्यक्ष,युवा नेते नितीन शिंदे, बाबुराव चव्हाण कोरेगाव सातारा खटाव विधानसभा मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे होवू घातलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निर्णय भूमिका ठरविण्यासाठी हा निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठरवेल पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी पक्ष वाढीसाठी व कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिवस-रात्र एक करून त्यांनी अल्पावधीतच पक्षवढीचे केलेल्या कामाची दखल घेऊन पार्टीच्या वतीने त्यांचा भव्यदिव्य असा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व मागासवर्गीय बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांनी केले आहे.
