वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

दि. १०/१०/२४ : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शनिवार (दि. १२) दुपारी १२.३० वाजता वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, किसन वीर व किसन वीर-खंडाळा या दोन्ही कारखान्यावरील तोडणी यंत्रणाही लवकरच कार्यस्थळावर दाखल होणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊसही वेळेत तुटणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.

या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket