खोडसाळ प्रचारावर विश्वास ठेवू नये
सातारा – प्रतिनिधी वर्ये येथील के.बी.पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट परिसरातील दुपारी १ च्या सुमारास कडक उन्हात मधमाशी पोळ्याच्या माशा अचानक उठून चार विद्यार्थ्यांना चावा घेतला.तत्काळ दक्षता म्हणून त्याठिकाणी ताबडतोब फायर ईस्टिंगविसरचा वापर करून धुर निर्माण केला त्यामुळे माशा बाहेर गेल्या व पुढील अनर्थ ठरला. सदर चार मुलांना इन्स्टिट्यूकडून प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.त्या विद्यार्थ्यांशी संपर्क असून कोणतीही अडचण नसताना काही समाज माध्यम प्रतिनिधींकडून खोडसाळ प्रचार केला जात आहे.त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन संचालक डॉ.बी.एस.सावंत यांनी केले आहे
वरहाड्यांत आज दुपारी एक वाजता दुपारच्या कडक उन्हामुळे मोहाळाच्या मधमाशा बाहेरून आल्या वराड्यांत उभे असलेल्या चार मुलांना चावा घेतला. त्याठिकाणी ताबडतोब सदर मुलांना प्रथमोपचार करून ती मुले घरी गेली व ती आमच्या संपर्कात आहेत व व्यवस्थीत आहेत. समाज माध्यमाने खोडसाळ वृतीने चुकीची बातमी दिलेली आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये असे इन्स्टिट्यूट चे संचालक यांनी सांगितले.
