Home » राज्य » शेत शिवार » खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते वाईत कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भुमीपुजन

खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते वाईत कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भुमीपुजन

खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते वाईत कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भुमीपुजन

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)वाई येथे दिनांक 13 ते 17 दरम्यान होणारे कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन आज सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. महागणपती घाटावरील वीर जीवा महाले उद्यान येथे भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू असून प्रदर्शनाची जयत तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

  यावेळी प्रतापराव पवार, प्रमोद शिंदे, रमेश गायकवाड, भैय्या डोंगरे, भूषण गायकवाड, राजेश शिंदे, लक्ष्मण गायकवाड, सुशांत गोळे, चरण गायकवाड, आनंद चिरगुटे, संपत महांगडे, आनंदा गोळे, संपत मानकुंबरे, महेंद्र पुजारी, अमृत गोळे, आपासाहेब दाणवले, प्रणित पिसाळ, प्रविण मतकर, मयुर चव्हाण , किरण जाधव, केतन मराठे, बालकृष्ण तरडे, दिलीप वाडकर, सचिन पार्टे, अनिल पाटणे, सुनिल गोळे, सुधीर कदम,

प्रशांत भिलारे, प्रकाश सूर्यवंश, दिपक भंगे,  युगल घाडगे, राजू गायकवाड, मंगेश निकम, हर्षद वाडकर नंदकिशोर गायकवाड़, केदार काटे,प्रविण गोळे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. 

    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडपाचे पूजन करण्यात आले. तर नंतर खासदार नितीन पाटील यांनी प्रदर्शनाची सखोल माहिती घेतली. अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन संकल्पना समजतात आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी अशी कृषी प्रदर्शने शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहेत. सुशांत गोळे व मित्रपरिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन यावेळी, खा. नितीन पाटील यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket