खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू
- खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. टू व्हीलर वरून कोल्हापूरकडे जात असलेले एक दांपत्य उड्डाणपुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळले. या अपघातात पती उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी उन्नती उपेंद्र चाटे गंभीर जखमी झाल्या आहेत.
- पुणे बेंगलोर महामार्ग हा दुचाकी चालवण्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी भुईंज येथे एसटी अपघातात एका दुचाकी स्वाराचा गाडी खाली येऊन कोळसा झाला होता. सदर महामार्गावर फोर व्हीलर प्रचंड वेगवान स्थितीत चालताना दिसून येतात. महामार्गावरती दुचाकी चालविताना जीव मुटीत घेऊन प्रवास करावा लागतो. मुळातच या महामार्गावरती प्रचंड प्रमाणात खड्डे, आणि वर्षानुवर्षे संत पद्धतीने चालणारे कामकाज यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रोड ऑथॉरिटीज ऑफ इंडिया कडून या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे.