सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कास पठार समितीचा उपक्रम : वनप्राण्यांसाठी ४० ते ५० पाणवटे तयार

कास पठार समितीचा उपक्रम : वनप्राण्यांसाठी ४० ते ५० पाणवटे तयार

कास पठार समितीचा उपक्रम : वनप्राण्यांसाठी ४० ते ५० पाणवटे तयार

सातारा : सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कास पठार परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी कास पठार समितीने पुढाकार घेतला आहे. समितीच्या वतीने वनपरिसरात सुमारे ४० ते ५० पाणवटे तयार करण्यात आले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत जंगल परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोत आटू लागतात. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन कास पठार समितीने वनविभागाच्या सहकार्याने विविध ठिकाणी पाणवटे तयार केले आहेत. या पाणवट्यांमध्ये टँकर किंवा इतर माध्यमातून पाणी भरून वन्यप्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.

या उपक्रमामुळे हरण, ससे, माकडे तसेच इतर लहान-मोठ्या वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी समितीचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून या कार्याचे कौतुक होत असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket