कराड तासगाव रस्त्यावरून प्रवास, सावकाश जा अपघात होऊ शकतो
कराड -कराड तासगाव रस्त्यावरील शेणोली येथील एसटी स्टँड च्या शेजारी रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले असून याची चौकशी करून सदरचा रस्ता दुरुस्त करून द्यावा. मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे. रस्ते विकास महामंडळाने व मोठा अपघात होण्याची वाट पाहू नये.अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली आहे .
कराड तासगाव हा रस्ता गुहागर ते विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून गेल्या काही वर्षांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु अनेक ठिकाणी या रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः शेणोली ता कराड येथे पुलाच्या शेजारी मोठे दोन ते तीन खड्डे पडले असून या ठिकाणी वेगाने येणाऱ्या वाहनांचा अपघात झालेला आहे. आणि अजून काही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा खड्डा मोजून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक आणि ग्रामस्थ यांनी केलेली आहे.