नवी मुंबई येथील कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगला युवा नेतृत्व अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती
कराड :कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोपरखैरणे, नवी मुंबई येथे कराड तालुका रबर बॉल प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमाला मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी अतुल भोसले यांनी बक्षीस वितरण समारंभात खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक केले. कराड दक्षिण मतदार संघातील युवा नेतृत्व अतुलबाबा भोसले खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव आघाडीवर आहेत.
कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी 95 कोटीचा विकासनिधी अतुलबाबा भोसले यांनी मंजूर करून आणला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले पाहिजेत यासाठी अतुलबाबा भोसले यांचे विशेष प्रयत्न असतात. कराड दक्षिण मतदार संघातील मुंबई, नवी मुंबई रहिवाशी मतदार बंधू भगिनींशी लीग निमित्ताने अतुलबाबा भोसले नी संवाद साधला.
खेळांना पाठिंबा देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना चमकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कराड क्रिकेट असोसिएशन लीग ही एक प्रमुख क्रिकेट स्पर्धा आहे जी सर्वोत्तम प्रतिभांना एकत्र आणते तसेच नवोदित क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक वातावरणही देते.