कनिष्का पॅरामेडिकल कॉलेज सातारा च्या DMLT या दोन वर्षीय पॅरामेडिकल कोर्सचा या वर्षी चा निकाल शंभर टक्के
सातारा -कनिष्का पॅरामेडिकल कॉलेज सातारा च्या DMLT या दोन वर्षीय पॅरामेडिकल कोर्सचा या वर्षी चा निकाल शंभर टक्के लागला असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अवघवीत यश संपादित केले
संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या DMLT कोर्स मुळे अनेक मुलं मुली स्वतःच्या नोकरी व्यवसायात काम करीत असून सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून 100 टक्के निकालाची परंपरा या वर्षी देखील कायम राहिली असून यामध्ये प्रथम क्रमांक कल्याणी गायकवाड (81.22%), द्वितीय क्रमांक धनलक्ष्मी वर्पे (76.44%),तृतीय क्रमांक सानिका दुताळ (72%) या मुलींनी यश मिळविले, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कॉलेज असल्याने प्रवेश घेतलेल्या मुलांना भविष्यात अनेक सरकारी खाजगी नोकरी तसेच स्वतःचे व्यवसाय करता येत असल्याने या कोर्स ला मागणी मोठ्या प्रमाणात आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन डॉ.निलेश थोरात यांनी अभिनंदन केले.




