Home » राज्य » प्रशासकीय » लोकशाही मूल्यांना बळ देणारी न्यायालयीन वास्तू – उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाची पायाभरणी

लोकशाही मूल्यांना बळ देणारी न्यायालयीन वास्तू – उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाची पायाभरणी

लोकशाही मूल्यांना बळ देणारी न्यायालयीन वास्तू – उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाची पायाभरणी

भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्या हस्ते उच्च न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ आयोजित केल्याचा आम्हाला अभिमान आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी आम्ही गेली सात-आठ वर्षे सातत्याने प्रयत्न करत होतो. त्यानंतर आजचा हा दिवस उजाडला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेल्या माजी मा. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळात या इमारतीसाठीची जमीन निश्चित करून ती उच्च न्यायालयाला सुपूर्द केली आणि आता, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्या हस्ते या इमारतीचा कोनशिला समारंभ होत आहे, आमच्यासाठी ही विशेष अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

बॉम्बे हायकोर्ट हे 1862 साली तयार झालेले आणि देशातील अतिशय जुन्या न्यायसंस्थांपैकी एक आहे. बॉम्बे हायकोर्टाचे वय हे देशाच्या सुप्रीम कोर्टापेक्षा देखील जास्त आहे. या हायकोर्टाने खूप मोठा इतिहास बघितला आहे. लोकमान्य टिळकांची जी ट्रायल झाली ती जागा या कोर्टाने अतिशय चांगल्या प्रकारे जोपासली आहे. अनेक प्रकारच्या घटना या कोर्टाने बघितल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

ही इमारत देशातील सर्वात वेगवान, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानयुक्त न्यायालयीन संकुल म्हणून ओळख निर्माण करेल, असा आमचा निर्धार आहे. भविष्यात न्यायालयीन वास्तू उभारणीचे उदाहरण द्यायचे झाले तर ही इमारत आदर्श प्रमाण ठरेल, असे काम आम्ही करणार आहोत. असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

या ऐतिहासिक कार्यक्रमात आमंत्रित केल्याबद्दल मा. उच्च न्यायालय आणि मा. सरन्यायाधीश यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक आभार मानले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 57 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket