Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जेथे धर्म, तेथे विजय आणि जेथे राम, तेथे सत्य!इतिहासाच्या प्रत्येक वळणावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बंजारा समाज

जेथे धर्म, तेथे विजय आणि जेथे राम, तेथे सत्य!इतिहासाच्या प्रत्येक वळणावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बंजारा समाज

जेथे धर्म, तेथे विजय आणि जेथे राम, तेथे सत्य!इतिहासाच्या प्रत्येक वळणावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बंजारा समाज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम नवमी व श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळ्यास ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. यावेळी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे उपस्थित बंजारा समाजबांधवांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम नवमी हा केवळ सण नसून आपल्या अस्मितेचा, श्रद्धेचा व परंपरेचा दिवस असल्याचे सांगितले. यासोबतच प्रभू श्रीराम यांच्या जीवनाकडे पाहत असताना समता, न्यायप्रियता आणि प्रत्येकाला संधीची समानता देणारे रामराज्य आणण्याचा मानस व्यक्त केला. प्रभू श्रीराम यांनी वनवासात असताना सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम केले. त्याचप्रकारे श्री संत सेवालाल महाराज यांनी रामनवमीच्या दिवशी एक बनजारा समाजाचा मेळा आयोजित केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऋग्वेदापासून ते गुरुग्रंथ साहिबपर्यंतच्या बंजारा समाजाच्या प्राचिनतेचा प्रवास सांगत बंजारा समाजाने इतिहासाच्या प्रत्येक वळणावर निर्माण केलेल्या आपल्या वेगळ्या ओळखीला अधोरेखित केले. गुरु ग्रंथ साहिबमध्ये ‘हम बंजारे राम के’ असा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. बंजारा समाज हा शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचे प्रतिक राहिलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बंजारा समाजाने स्वातंत्र्यानंतर पुनर्निर्माण करत अनेक क्षेत्रामध्ये बंजारा समाजातील नेत्यांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केल्याचे अधोरेखित केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले. आजही महायुती सरकारचे मंत्री आणि आमदार बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करताना चांगले काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजरा समाजाची काशी, म्हणजेच पोहरादेवीचा विकास करण्यासाठी मागील काळात मुख्यमंत्री असताना ₹100 कोटींची तरतूद करून नंतरच्या काळात आराखड्याला चालना देण्याचे काम केल्याचे सांगितले. ₹700 कोटी खर्चून आज ‘नांगरा भवन’ आणि विविध मंदिरांचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बंजारा बोर्ड’ची स्थापना केली. यासोबतच ‘नांगरा भवन’च्या उदघाटनानिमित्त पोहरदेवी येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, येथे आलेले भारताचे पहिले पंतप्रधान असल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यामध्ये वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना, तांड्याला ग्रंपंचायतीचा दर्जा देण्यासाठी सर्व अटी शिथिल करणे, तांड्यासाठी ‘सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजने’मार्फत तांड्याला मूलभूत सोयी पुरवून यासाठी केलेली ₹500 कोटींची तरतूद आणि मुंबईमध्ये ‘बंजारा भवन’ निर्मितीचे काम अधोरेखित केले. बंजारा समजाच्या विकासासाठी आपले सरकार सातत्याने काम करत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. याचे श्रेय बंजारा समजाच्या धर्मगुरू आणि भाविकांना देत ही सेवा घडण्यासाठी आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यासोबतच अतिशय ताकदीने बंजारा समाजाच्या पाठीशी उभे राहून, पोहरादेवीच्या विकासाचे राहिलेले काम पूर्ण करण्याचे तसेच रस्ते आणि रेल्वेमार्फत पोहरादेवीला जोडून यास देशातील एक महत्त्वाचे स्थान बनवण्याचे आश्वासित केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, जेथे धर्म आहे तेथे विजय असल्याचे आणि जेथे राम आहे तेथे सत्य असल्याचे लक्षात ठेऊन धर्माची आणि सत्याची कास कधीच न सोडण्याचे सर्वांना आवाहन केले. यासोबतच श्री संत सेवालाल महाराज यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचे देखील आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय राठोड, मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket