Home » ठळक बातम्या » रात्रंदिवस जनतेसाठी झटणाऱ्या आ.जयकुमार गोरेंच्या पाठिशी दोन्ही तालुके ठाम उभे

रात्रंदिवस जनतेसाठी झटणाऱ्या आ.जयकुमार गोरेंच्या पाठिशी दोन्ही तालुके ठाम उभे

रात्रंदिवस जनतेसाठी झटणाऱ्या आ.जयकुमार गोरेंच्या पाठिशी दोन्ही तालुके ठाम उभे

माण – खटावला एकाच आईची लेकरे मानून काम करताना मी कधीच दुजाभाव केला नाही. उलट खटावला काकणभर जास्तच देण्याचा प्रयत्न-आ.जयकुमार गोरे 

१५ वर्षांपूर्वी माण – खटाव मतदारसंघात खूप विदारक परिस्थिती होती. गावोगावी रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांची वानवा होती. दुष्काळी परिस्थिती जनतेला सतावत होती. मी इथल्या मायबाप जनतेला दुष्काळमुक्तीचे स्वप्न दाखवले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत केली. पाण्याचे फेरवाटप करण्यासारखा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला. आता तर उरमोडी, जिहेकठापूर, तारळीचे पाणी येत असून टेंभू योजनेची कामे सुरु झाल्याने दुष्काळमुक्ती दृष्टिक्षेपात आली आहे. प्रभाकर घार्गेंसह विरोधक टोळके मात्र दररोज बोरीचा बार भरवून त्यांची खरी लायकी दाखवत असल्याचा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला. 

खटाव तालुक्यातील अंबवडे येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 आ.जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मी गेली १५ वर्षे माण – खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि मायबाप जनतेची ईमानेइतबारे सेवा केली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. जनतेचे आशिर्वाद कायमच माझ्या पाठिशी राहिले असल्याने माझा अर्ज भरला त्या दिवशीच मी निवडणूक जिंकली आहे. माझा आदर्श घेऊन अनेक युवकांनी व्यायाम सुरु करुन तब्ब्येत चांगली करण्याचा आदर्श घेतला आहे. नको ते अनेक उद्योग करणाऱ्या प्रभाकर घार्गेंचा युवकांनी कोणता आदर्श घ्यायचा असा सवाल आ. जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला. 

     माण – खटावला एकाच आईची लेकरे मानून काम करताना मी कधीच दुजाभाव केला नाही. उलट खटावला काकणभर जास्तच देण्याचा प्रयत्न केला. विरोधक मात्र फेक नेरेटीव्ह पसरवून दोन्ही तालुक्यात भांडणे लावत आहेत. त्यांनी माणूस माणसात ठेवला नाही. पाण्याला आणि मातीचा जात नसते मात्र घार्गे आणि त्यांचे टोळके त्यातही राजकारण आणत आहे. मी पाणी आणले म्हणूनच त्यांनी साखर कारखाना सुरु केला. पाणी आणि ऊसाची शेती नसती तर त्यांनी कारखान्यात काय कुसळं घातली असती का ? 

    आ.गोरे पुढे म्हणाले, विरोधक माझा खूप द्वेष करतात. मी बारामती, फलटणकरांसमोर झुकत नाही याचे त्यांना शल्य आहे. मी पाणी आणून दुष्काळमुक्ती अंतिम टप्प्यात आणतोय हे त्यांना सहन होत नाही. म्हणूनच गेल्या १५ वर्षात त्यांनी मला एकही दिवस सुखाने जगून दिले नाही. त्यांनी मला दिलेल्या त्रासाची फिकीर नाही कारण जनतेचे आशिर्वाद माझ्यावर कायम राहिले आहेत. प्रत्येक निवडणूकीत विरोधकांनी मला चक्रव्यूहात अडकविण्याचे प्रयत्न केले पण त्यांचे इप्सित कधीच साध्य झाले नाही. मी युवकांना निर्व्यसनी रहाण्याची, व्यायाम करुन तब्ब्येत चांगली करण्याची प्रेरणा देतो, नको नको ते छंद आणि सवयी असणारे घार्गे कोणती प्रेरणा देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

गावोगावी जय हो चा उठाव झालाय …

माण – खटावमध्ये जयाभाऊ नावाच्या वाघाने पाणी आणले आहे. इतरांच्यात दम नव्हता. जे शब्द आमदारांनी दिले ते पूर्ण करुन दाखवले. गावागावातून जय हो चा उठाव झाला आहे. रात्रंदिवस जनतेसाठी झटणाऱ्या आ.गोरेंच्या पाठिशी दोन्ही तालुके ठाम उभे राहिले आहेत. विरोधकांनी धसका घेऊन निवडणूक सोडून देण्याची मानसिकता केली असल्याचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 20 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket