समृद्ध जीवन व व्यक्तिमत्वासाठी खेळणे आवश्यक – जगदीश जगताप.
तांबवे –आपले जीवन समृद्ध करण्यासाठी व व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनी खेळले पाहिजे असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी केले. वडगांव हवेली ता कराड येथे बीट स्तरावरील क्रिडा स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच सचिन चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी निवास पवार, केंद्र प्रमुख राजेंद्र कुंभार,शिवाजंली सांळुखे, मुख्याध्यापक यशवंत खाडे, दिलीप जाधव, क्रिडा शिक्षक सुभाष कुंभार,वळवके, दादासाहेब शेंडगे,महेश बोंगाळे, महेश लोखंडे यांची उपस्थिती होती.
जगदिश जगताप म्हणाले विद्यार्थी सर्वांगीण विकासात विविध प्रकारचे खेळ आपल्याला मदत करतात त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने जीवनात खेळाची आवड जोपासावी.
सरपंच राजेंद्र जगताप म्हणाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने परिसर चांगला लाभला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय खेळामध्ये भाग घेऊन आपले आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव द्यावा.
शिक्षण विस्तार अधिकारी निवास पवार म्हणाले शालेय वयात खेळामध्ये सहभाग घेतल्यामुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी खेळामुळे आज राज्य, देश पातळीवर क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत.दरम्यान क्रीडा स्पर्धेत सहभागी वडगांव हवेली,गोळेश्वरव रेठरे बुद्रुक केंद्रातील खेळाडूंनी संचलन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्र प्रमुख राजेंद्रकुंभार यांनी सूत्रसंचालन सुभाष कुंभार व आभार केंद्र प्रमुख शिवांजली सांळुखे यांनी मानले.