Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » डॉ.बाबासाहेबांचे संविधान आचरणात आणण्याची आपली जबाबदारी – पृथ्वीराज चव्हाण

डॉ.बाबासाहेबांचे संविधान आचरणात आणण्याची आपली जबाबदारी – पृथ्वीराज चव्हाण

डॉ.बाबासाहेबांचे संविधान आचरणात आणण्याची आपली जबाबदारी – पृथ्वीराज चव्हाण

कराड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले असून तें आचरणात आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला पृथ्वीवरचा प्रवास थांबवला. परंतु त्यांचा विचार त्यांनी देशाला दिलेले संविधान हे या देशातील जनता कधीही विसरणार नाही. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व्यक्त करतो. यनिमित्ताने देशातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि संविधान वाचवण्याची लढाई ही कायमस्वरूपी आपल्याला लढावी लागेल कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे कि, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं हाच त्यांनी दिलेला संदेश त्या संदेशाच्या आधारे मला खात्री आहे कि, महाराष्ट्रातील सर्व जनता पुन्हा नवीन प्रेरणा घेऊन संविधान बाबतची लढाई अधिक ताकतीने लढेल. महाराष्ट्र मध्ये जे काही चाललं आहे त्याबाबत आपली प्रखर भूमिका घेईल आणि न्यायाचं, समतेच, बंधुत्वाचं राज्य आणि संविधान जे कधीही नष्ट होणार नाही याची काळजी घेईल. अशी प्रतिक्रिया यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket