Post Views: 53
आयफोनची निर्मिती भारतात करु नका,डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कूक यांना अॅपल आयफोनची निर्मिती भारतात करु नये आणि अमेरिकेत उत्पादनावर लक्ष केंद्रित करावं अशी विनंती केली आहे. गेल्या पाच वर्षांत, भारत अॅपल आयफोनच्या सर्वात मोठ्या उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात 12 महिन्यांत कंपनीच्या असेंब्ली लाइन्सने २२ अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन बनवले आहेत. अमेरिकेतील कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत भारतात 60 टक्के जास्त आयफोनचे उत्पादन केलं आहे.
