दुबळ्या आयर्लंड कडून भारताचा ३४ धावांनी पराभव
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दोन टी २० सामन्यातील पहिल्या सामन्यात आयर्लंड संघाने प्रथमच भारतीय संघाचा ३४ धावांनी पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाने गोलंदाजी स्वीकारली होती.आयर्लंड संघाकडून डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती.परंतु कर्णधार टकरचे अर्धशतक आणि डेलेनी यांच्या ४९ धावांच्या जोरावर आयर्लंड संघाने १८२ धावा केल्या.सामन्यात भारतीय संघाकडून प्रसिद्ध कृष्णा सर्वात महाग ठरला.
प्रत्युत्तरासाठी आलेल्या भारतीय संघाला संजू सॅमसन च्या रूपात पहिला धक्का बसला.सलामीवीर अभिषेक शर्मा एक बाजू धरून होता मात्र त्याच्या सोबत येणारा खेळाडू फक्त जणू हजेरी लाऊन जात होता.अभिषेक शर्मा देखील ४९ धावांवर बाद झाला.त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे ने थोडा वेळ मैदानावर घालवला मात्र त्यांना देखील यश मिळाले नाही.आज पहिल्यांदाच आयर्लंड संघाने भारतीय संघाचा पराभव करत सर्वांना धक्का दिला.दोन सामन्यांच्या मालिकेत आता आयर्लंड संघाने १-० अशी आघाडी घेत मालिकेवर वर्चस्व राखले आहे.पुढील सामना जिंकून ते प्रथमच मालिका जिंकणार असे वाटत आहे.श्रेयस अय्यर याच्या कर्णधार पदाची सुरवात मात्र खराब झाली आहे.




