भारताने गमावला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ, डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारतीय खगोलशास्त्राला नवे वळण देणारे आणि विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी विशेष योगदान देणारे डॉ. नारळीकर यांचं जाणं हे विज्ञानजगतातील मोठं नुकसान मानलं जात आहे.केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, त्यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्यही तितक्याच ताकदीनं केलं. रसाळ आणि ओघवत्या शैलीतील त्यांच्या मराठी विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक लेखनामुळे त्यांना वाचकप्रियता लाभली. त्यांनी “चला जाऊ अवकाश सफरीला”, “टाइम मशीनची किमया”, “व्हायरस” यांसारख्या अनेक कथा आणि “विश्वाची रचना”, “विज्ञानाची गरुडझेप” यांसारखी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.
डॉ. नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यात प्रमुख आहेत:पद्मविभूषण (2004)महाराष्ट्र भूषण (2010)
