Home » राजकारण » सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेणं का टाळले?

सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेणं का टाळले?

सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेणं का टाळले?

सातारा(अली मुजावर ): राष्ट्रीय काँग्रेसचे टॉप लीडर राहुल गांधी यांनी नुकतीच सांगलीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कडेगाव येथील पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत नरेंद्र मोदींवर सडकून टिका केली.

या भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांचं नाव घेतलं. पण त्यांनी यावेळी व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेणे टाळले. महाराष्ट्राच्या  राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाली . राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव का घेतले नाही याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याचे अगदी जवळचे म्हणून ओळखले जात होते. राज्यासह देशातील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असायचा. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह 23 नेत्यांनी काही वर्षापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. तेव्हा पासून राहुल गांधींच्या जवळच्या सर्कल मधून चव्हाण बाहेर निघाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका राहुल गांधी यांना पटली नाही अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. दिल्ली काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना असणारा मान कमी झाल्याचे दिसत आहे.

या कार्यक्रमात काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांसह तरूण नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी राज्यातल्या शरद पवार,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांचे नाव भाषणाच्या सुरूवातीला घेतले. त्यानंतर त्यांनी सतेज पाटील, खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांचेही नाव घेतले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण ये व्यासपीठावर होते. शिवाय ते पहिल्या रांगेत बसले होते. अशा वेळी चव्हाण यांचे नाव न घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. ज्या वेळी काँग्रेस अडचणीत होती त्यावेळी काही नेत्यांनी पक्ष नेतृत्वा विरोधात भूमिका घेतली होती. त्यात देशातल्या 23 बड्या नेत्यांचा समावेश होता. त्या पैकी एक पृथ्वीराज चव्हाण हे ही होते. त्या कारणानेच चव्हाण यांना राहुल गांधी यांनी टाळले असेही बोलले जात आहे. एकेकाळी गांधी परिवाराशी अतिशय जवळ असणारे पृथ्वीराज चव्हाण कुटुंबीय दुरावल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्याने काँग्रेसला बॅकफूट वर जावे लागले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले याचीही चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket