Home » Uncategorized » खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) मेळावा

खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) मेळावा 

खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) मेळावा 

भुईंज : (महेंद्रआबा जाधवराव ) भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर यांनी दिली आहे. 

          मेळाव्याच्या नियोजनार्थ सुनील काटकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी काटकर बोलत होते. बैठकीला माजी नगराध्यक्ष अशोक मोने, प्रकाश बडेकर, राजू भोसले, अविनाश कदम, प्रकाश गवळी, दत्ताजी थोरात, जयवंत भोसले, बाळासाहेब गोसावी, शेखर मोरे पाटील, अमोल मोहिते, रवी ढोणे, मनोज शेंडे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्रात एक नंबरच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना काटकर यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या. 

           दरम्यान, सातारा शहर आणि सातारा- जावली मतदारसंघात येणारी सातारा तालुक्यातील सर्व गावे यांचा संयुक्त प्रचार मेळावा होणार असून या मेळाव्यात खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, रयतक्रांती संघटना व घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, सातारा जिल्हा परिषद व सातारा पंचायत समितीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सदस्य, सातारा पालिकेचे सर्व आजी- माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला सातारा शहर व सातारा तालुक्यातील (सातारा- जावली मतदारसंघातील) सर्व नागरिक व जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील काटकर, विधानसभा संयोजक अविनाश कदम, सुवर्णा पाटील, रेणू येळगावकर, भाजप तालुकाध्यक्ष महेश गाडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, शशिकांत वाईकर, शिवसेना शिंदे गटाचे निलेश मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket