सिद्धनाथवाडीकरांचा हा सत्कार म्हणजे जन्मगावाचा सन्मान असल्याचे आपण मानतो-खासदार नितिनकाका पाटील
खासदार नितीन पाटील; राज्यसभा निवडीबद्दल सिद्धनाथवाडी ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार
वाई प्रतिनिधी -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला जागणारे नेतृत्व आहे. त्यांच्यामुळेच आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे- पाटील यांच्या सहकार्यामुळे भुईंज व खंडाळा येथील किसन वीर साखर कारखान्यावरील जप्तीचे संकट टळले, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी येथे केले.राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व कारखान्याचे संचालक नितीन पाटील यांचा सिद्धनाथवाडी ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी मकरंद पाटील युवा मंचच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भेट देऊन तसेच विकास सोसायटी, जय अंबिका,मोरया व कृष्णा महिला बचत गट, वाई शहर रिक्षा संघटनेने नितीन पाटील यांचा सत्कार केला.याप्रसंगी अनिल सावंत, अॅड. श्रीकांत चव्हाण, रमेश गायकवाड, भूषण गायकवाड, नारायण जाधव, मनोज पवार, राजाभाऊ नेवसे, मोहन जाधव, बापूसाहेब जमदाडे, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, भारत खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याने विधानसभेत राज्यातील सर्व प्रमुख पक्ष सत्तेत आणि विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे राजकीय इतिहास निर्माण झाला असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नितीन पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार अजित पवार यांनी केला होता. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याची जागा भाजपला गेली; परंतु नितीन पाटील यांना राज्यसभेचे खासदार करून त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.” राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरच आपण विकासकामांच्या बळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत, असेही ते म्हणाले,
खासदार पाटील म्हणाले, “आपला जन्म वाईत झाला असून, सोनगीरवाडी व सिद्धनाचवाडी परिसरात बालपण व शालेय शिक्षण झाले. वाईकरांनी लहानपणापासून केलेले प्रेम आजही कायम ठेवले आहे. त्यामुळे सिद्धनाथवाडीकरांचा हा सत्कार म्हणजे जन्मगावाचा सन्मान असल्याचे आपण मानतो.”
यावेळी प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, नितीन भरगुडे पाटील, प्रा. डी. बी. खरात, संजय चव्हाण यांची भाषणे झाली. गुरुप्रसाद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आबा जायगुडे, सुधीर खरात, जयवंत कचरे, उमेश जायगुडे, राहुल खरात, बापूराव खरात, मोहन घाडगे, वामन खरात, आबा डोंगरे, हणमंत दुधाणे, राहुल जायगुडे, हेमंत दुधाणे, विजय चौधरी, सुरेश भोसले, महेश जायगुडे, सुनील चौधरी, नारायण बरकडे, डी बी खरात,आबा जायगुडे, संजय चव्हाण सुधीर खरात जयवंत कचरे, उमेश जायगुडे, राहुल खरात,मयूर खरात,सनी चव्हाण,बापूराव खरात,मोहन घाडगे, वामन खरात, आबा डोंगरे,हणमंत दुधाने,राहुल जायगुडे, हेमंत दुधाने,विजय चौधरी,सुरेश भोसले,महेश जायगुडे,सुनील चौधरी,नारायण बरकडे, चाचा खरात युगल घाडगे शंकर खरात पाटीलआदींनी स्वागत केले. मयूर खरात, राहुल खरात यांनी आभार मानले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.