सौ.सुशिलाताई परांजपे विदयालय अतिट येते ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.
शिरवळ प्रतिनिधी -सौ. सुशिलाताई परांजपे विदयालय, अतिट शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळेतील २००३-०४ १० वी बॅचचे माजी विद्यार्थी मा. श्री.प्रशांत व्यंकट जाधव (पोलीस पाटील अतिट) आणि मा.श्री.निलेश शंकर गुरव ( Enviro Techs Pest Control & Multiservices) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत व संविधान सादर केले.MCC विद्यार्थ्यांनी सुंदर संचलन केले. सर्व विद्यार्थ्यांनी बैठे आणि खडे कवायत प्रकार व लाठी-काठी प्रात्यक्षिक व देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिन्ही भाषेत सुंदर अशी भाषणे झाली.
यावेळेस कै.दिलीप वाळींबे यांचे स्मरणार्थ श्रीमती. स्मिताताई वाळींबे यांनी १० वी बोर्ड परीक्षा मार्च २०२४ मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेले व शै.वर्ष २०२३-२४ मधील उत्कृष्ठ खेळाडू या विद्यार्थ्याना दिलेल्या रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर शालेय,तालुका,जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झालेल्या क्रीडा व इतर विविध स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव रुपालीताई जाधव सरपंच, गणेश मांढरे उपसरपंच सौ. मथुरा शंकर जाधव चेअरमन, श्रीम . जनाबाई चव्हाण व्हा.चेअरमन नवनाथ मारुती जाधव सचिव वि.वि.का.से.सोसायटी अतिट. श्रीमती स्मिताताई वाळींबे (संचालिका ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्था,शिरवळ.)इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्या. श्री. तळेकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री. घाडगे एम.जी. सरांनी मानले.
