हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाळांचे शालांत परीक्षेत उज्ज्वल यश
माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाळांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे .महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत हिलरेंज हायस्कूल भिलार या शाळेचा शंभर टक्के , कै.एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी या शाळेचा ९७ टक्के निकाल तर हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलार या शाळेचा निकाल ९६.५ टक्के लागला आहे .
हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलार या शाळेतील पायल किरण पारठे ( ९४.८० टक्के), आदर्श राजाराम बिरामणे (९३.८० टक्के ) द्वितीय तर अर्पिता रवींद्र गावडे(९२ टक्के ) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
हिलरेंज हायस्कूल भिलार या शाळेचा यश दत्तात्रय पारठे (८६ टक्के)प्रथम क्रमांक, मनस्वी किशोर ताथवडेकर ( ८५.२० टक्के )द्वितीय तर वरद समीर धनावडे (८४.८० टक्के) तृतीय क्रमांक मिळवला.
कै. एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी
या शाळेची श्रद्धा राजेंद्र राजपुरे (९१.२०टक्के ) प्रथम, मयुरी महेंद्र भगत (८९.६०टक्के) द्वितीय , समीक्षा कृष्णा शेलार (८५.८०टक्के) तृतीय क्रमांक मिळवला
या यशाबद्दल जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ.तेजस्विनी भिलारे,तेजस्विनी भिलारे, सरपंच शिवाजी भिलारे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण भिलारे, जावली महाबळेश्वर बाजार समीतीचे सदस्य राजेंद्र भिलारे, मुख्याध्यापक मुकुंद शिंदे,माजी मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, सुनील गुरव , नंदकुमार शिंदे, भिकू पिसाळ यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले .
