Post Views: 73
हजारमाची माध्यमिक विद्यालयाचे विभागीय कुस्ती स्पर्धेत यश
तांबवे –विभागीय स्तरावर झालेल्या शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड हजार माचीयेथील राजवर्धन अजय भोगे याने विभाग स्तरावरील फ्री स्टाईल कुस्तीत ५१ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्याची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याच्या या यशासाठी संस्थेचे सचिव डी. ए. पाटील , संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा पानवळ, क्रीडा शिक्षक अनिल जाधव, अंजली पाटील, तानाजी राजमाने, सुरेश वेताळ,राजु अपिने संजय गोसावी ,सुवर्णा शिनगारे, शशिकला पोळ, चंद्रकांत डुबल, वसंत मोहिते, ओंकार रांगोळे या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले.
