आरोपीला निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी
पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुण्यात मद्यधुंद अवस्थेत भरदाव वेगाने कार चालवत दुचाकीवरील दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत त्याचा जामीन मंजूर केला होता. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर आणि महाराष्ट्रात चांगलाच संताप पाहायला मिळाला. त्यानंतर आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.
दरम्यान, आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.