ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत डाॅल्बी व लेजरला बंदी – रमेश गर्जे

भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत डाॅल्बी व लेजरला बंदी – रमेश गर्जे

भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत डाॅल्बी व लेजरला बंदी – रमेश गर्जे

वाई : भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव काळात गणेश मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजाच्या डाॅल्बीसह लेजर किरण लाइटला पुर्ण बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी आज झालेल्या बैठकीत दिली आहे.

भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक पोलिस ठाण्याच्या कार्यालयात घेण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शनपर सूचना करताना श्री रमेश गर्जे बोलत होते.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भडांरे, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र जाधव, हद्दीतील विविध गावचे पोलिस पाटील व सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.श्री रमेश गर्जे म्हणाले , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या आदर्श नियमावलीची अमंलबजावणी करावी त्यात परवान्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावेत, धर्मादाय आयुक्त यांचेकडे मंडळाची नोंद करावी, पोलीसांनी ठरवुन दिलेल्या वेळेतच गणेशविसर्जन मिरवणुक काढावी. गणेशोत्सवा करिता कोणाही व्यक्तीवर वर्गणीसाठी दबाव आणुन सक्तीने वर्गणी गोळा करु नये, उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य व सलोखा वाढीस लागेल अथवा देशभक्तिपर देखावे उभे करावेत. ध्वनीक्षेपकामुळे ध्वनी प्रदुषण होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. मिरवणुकीच्या वेळी इतर धर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ज्यादा वेळ मिरवणुक रेंगाळत ठेऊन गुलालाची उधळण करु नये. मिरवणुकीत जातीय सलोखा भंग होईल अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा देऊ नये. मिरवणुकीत मदयपान करुन बिभत्स हातवारे, नृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेळी मुली महिलांची छेडछाड होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. ठरवुन दिलेल्या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा मानांकनातच वापर करावा. गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेळी लागु असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे तसेच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या सुचना तसेच आदेशाचे तंतोतंत पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. गणेशोत्सव कालावधीत कोणत्याही प्रकारे अफवा पसरविल्या जाणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्यात यावी . सार्वजनिक मंडळांनी सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket