साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » धोम तालुका वाई येथे २८ फेब्रुवारीला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा भव्य महामेळावा

धोम तालुका वाई येथे २८ फेब्रुवारीला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा भव्य महामेळावा

धोम तालुका वाई येथे २८ फेब्रुवारीला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा भव्य महामेळावा

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे-28 फेब्रुवारी रोजी आयोजन

सातारा दि. 18 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व तालुका विधी सेवा समिती, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री नरसिंह हायस्कूल, धोम ता. वाई येथे “विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या महाशिबीरामध्ये नागरिकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन कौटुंबिक व जमीन विषयक प्रश्नांवर सल्ला तसेच महिला, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपलब्ध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजनांची माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार असून काही ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिबीरात आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड इत्यादी नोंदणी व अद्यावतीकरण केले जाणार आहे. आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप व मोफत शस्त्रक्रियेकरिता नोंदणी केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांबाबत माहिती करून घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए.एस. वाघमारे व जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, वाई यांनी केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket