Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा ग्रंथ महोत्सवाचे शुक्रवारी शानदार उदघाटन

सातारा ग्रंथ महोत्सवाचे शुक्रवारी शानदार उदघाटन

सातारा ग्रंथ महोत्सवाचे शुक्रवारी शानदार उदघाटन

खा.उदयनराजे भोसले, राजीव खांडेकर व प्रवीण दवणे यांची उपस्थिती; कथाकथन आणि गीतांची मैफिलही रंगणार

सातारा : वाचन संस्कृती वाढविण्याचा पॅटर्न ठरलेल्या सातारा ग्रंथमहोत्सवाचे शानदार उदघाटन उ‌द्या शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक राजीव त्यांच्या हस्ते व प्रसिद्ध लेखक कवी प्रवीण दवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अध्यक्षस्थानी असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. शंभरहून अधिक स्टॉलमधील विविध प्रकारच्या पुस्तकांच्या सानिध्यात आणि भरगच्च साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मांदियाळीत गेल्या २३ वर्षापासून हा ग्रंथ महोत्सव सुरु आहे. पुस्तकांची कोट्यवधी रुपयांच्या विक्री उलाढाल या महोत्सवात होते. यावर्षी या महोत्सवाचे उदघाटन एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते होत आहे. मराठी पत्रकारिता क्षेत्रातील एक नामांकित तज्ज्ञ म्हणून श्री. खांडेकर परिचित आहेत. विविध मराठी वृत्तपत्रांतून संपादकीय कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. मराठी वृत्तपत्रांसाठी त्यांनी नवी दिल्ली येथून वार्ताकन केले आहे. त्याद्वारे अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. एबीपी माझा (पूर्वीची स्टार माझा) वृत्तवाहिनीच्या स्थापनेपासून ते या वाहिनीचे संपादक असून वृत्तवाहिनींच्या जगतात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. एबीपी माझा वरील माझा कट्टा हा त्यांनी सुरु केलेला उपक्रम प्रसिद्ध आहे. त्यांच्या विपुल अनुभवाचे मार्गदर्शन महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.

प्रवीण दवणे मराठीतील मोठे लेखक व कवी आहेत. त्यांच्या लेखनातून मराठी मने समृद्ध होण्यास मदत झाली आहे. अनेक चित्रपटांमधील गीतांचे लेखन त्यांनी केले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे सर्वांगीण विकासासाठीचे योगदान महाराष्ट्राला माहिती आहे. वाचन संस्कृतीला त्यांनी नेहमीच मोठे बळ दिले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उपक्रम राबविले आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमुळे ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन म्हणजे रसिकांना मेजवानी मिळणार आहे.उद्‌घाटनानंतर दुपारी दोन वाजता कथाकथन कार्यक्रमाल रवींद्र कोकरे व राजेंद्र कणसे या प्रमुख कथाकथनकारांसह निवडलेल्या निवडक कथाकारांचे कथांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मा. स्वप्निल पोरे, मा. श्रीकांत कात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पाच वाजता तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याविषयीचा वक्ते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमास विनोद कुलकर्णी, अविनाश कदम व दीपक शिंदे हे उपस्थित राहणार असून सात वाजता सप्तसुरांची इंद्रधनु ही मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफिल होणार आहे. याचे प्रमुख पाहुणे काका पाटील, धनंजय फडतरे, डॉ. प्रमोद फरांदे आणि सुरेश चिंचकर हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथमहोत्सवाचे कार्यवाह शिरीष चिटणीस, अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे आणि ग्रंथमहोत्सव समितीने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket