लोकविराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य घरगुती गौरी-गणपती देखावा स्पर्धा
वाई – लोकविराज प्रतिष्ठान, वाई-खंडाळा-महाबळेश्वर चे युवा नेते विराजभैय्या शिंदे आणि वाई पंचायत समितीच्या मा. सदस्या ऋजुताताई शिंदे यांच्या वतीने विधानसभा मतदारसंघातील भगिनींंंसाठी भव्य घरगुती गौरी-गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिंदे म्हणाले, की, “गेल्यावर्षी देखील आम्ही महिलांसाठी घरगुती गौरी गणपती स्पर्धा आयोजित केली होती.गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीचा सण आणखी गोड करण्यासाठी तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम मोठं व्यासपीठ ठरला. गेल्या वर्षी आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी देखील गावोगावीच्या महिलांकडून आमच्याकडे स्पर्धा कधी घेणार अशी विचारणा होत होती. त्यामुळे खास लोकाग्रहास्तव या स्पर्धा आयोजित केल्या आहेत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
ही स्पर्धा ०७ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२४ पर्यंत होणार असून यासाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९१३००७०८०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विराज शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.