नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

सातारा दि. १४ – महाराष्ट्र शासनातर्फे CDS पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत निवास, भोजन व प्रशिक्षण भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे Combined Defence Service (CDS) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १५ जून २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CDS कोर्स क्रमांक ६७ राबविण्यात येणार असून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहायचे आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षणासह निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ८ जून २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune च्या अधिकृत संकेतस्थळ mahasainik.maharashtra.gov.in⁠� वर जाऊन DSW Portal मधील “Resources – PCTC Nashik-CDS-67” या विभागातून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून लोकसंघ आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या CDS परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा.अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. ई-मेल : training.petenashik@gmail.com तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९१५६०७३३०६ उपलब्ध आहेत.

या संधीचा लाभ घेऊन भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदावर सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स. दै. हंगे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket