Home » राज्य » शिक्षण » गिरिस्थान प्रशालेत कै.मीराताई देशपांडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

गिरिस्थान प्रशालेत कै.मीराताई देशपांडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

गिरिस्थान प्रशालेत कै.मीराताई देशपांडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर: गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अमनोरा येस फाउंडेशन, पुणे आणि द चेंबर्स १८२८ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. मीराताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रशालेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री. योगेश बाळकृष्ण पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात अमनोरा येस फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. विवेक कुलकर्णी आणि द चेंबर्स १८२८ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कै. मीराताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना रोख रक्कम दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावर्षी कु. रिया कदम, कु. पूनम चिकणे, कु. अपेक्षा केळगणे, कु. स्नेहा जाधव, कु. राणी आखाडे आणि कु. भरत ढवळे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली.

या कार्यक्रमात बोलताना श्री. विवेक कुलकर्णी यांनी “मुलगी ही देवीचे रूप असून तिला शिक्षणाची संधी दिल्यास ती संपूर्ण कुटुंब उभे करू शकते,” असे विचार मांडले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या मदतीची समाजासाठी परतफेड करण्याचे आवाहन केले. तसेच, नोकरी मिळाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थिनीने इतर दोन विद्यार्थिनींचे ‘शैक्षणिक पालकत्व’ स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी “विद्यार्थ्यांनाही या योजनेत समाविष्ट करावे” असे मत मांडले आणि नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुधारणा व उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य श्री. पी. आर. माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक श्री. संदीप कदम यांनी केले. प्राध्यापक डॉ. बाजीराव शेलार यांनी सूत्रसंचालन केले आणि श्री. विशाल हिरवे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला श्री. अमित माने (करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी), श्री. परमेश्वर माने (प्राचार्य, गिरिस्थान प्रशाला), श्री. चंद्रकांत कदम (प्राचार्य), प्रा. बाजीराव शेलार (गिरिस्थान कला व वाणिज्य महाविद्यालय) आणि इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमासाठी अमनोरा येस फाउंडेशन आणि द चेंबर्स १८२८ यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket