Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गौरीशंकरचे डॉ. पी. व्ही . सुखात्मे स्कूल लिंबमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती उत्साहात संपन्न

गौरीशंकरचे डॉ. पी. व्ही . सुखात्मे स्कूल लिंबमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती उत्साहात संपन्न

रवींद्रनाथ टागोर कला संस्कृती व साहित्याचे खरे उपासक – श्रीरंग काटेकर

गौरीशंकरचे डॉ. पी. व्ही . सुखात्मे स्कूल लिंबमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती उत्साहात संपन्न

लिंब – संवेदनशील मनाचे कवी लेखक व साहित्यिक असलेले रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रगीताची निर्मिती करताना अखंड भारतातील संस्कृतीचा गाडा अभ्यास करून राष्ट्रगीताची निर्मिती केली आहे खऱ्या अर्थाने रवींद्रनाथ टागोर हे कला संस्कृती व साहित्यिक विचाराचे खरे उपासक होते असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब. ता. जि सातारा येथील गौरीशंकरचे डॉ. पी व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची 164 वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना ते बोलत होते.

यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, राकेश खोपडे, नितीन शिवथरे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली आहे त्यांच्या नैतिक विचाराची आजच्या समाजाला खरी गरज आहे प्रास्ताविक व आभार नितीन शिवतरे यांनी केले.

 भारतीय राष्ट्रगीताचे जनक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना 1913 रोजी नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरवलेले होते अखंड भारताच्या गौरवशाली इतिहासाचे ते खरे साक्षीदार होते कवी लेखक साहित्यिक व शिक्षण क्षेत्रात त्यांनी अतुलनीय कामगिरीचा सर्व भारतीयांना अभिमान वाटतो.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल

Post Views: 433 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल सातारा (अली मुजावर )साताऱ्यात आज

Live Cricket