गौरीशंकरचे चेतना इंग्लिश मिडियम स्कूल भक्तवडी चे विद्यार्थी गुणवत्तेत चमकले
साताररोङ – महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्डाने फेब्रुवारी मार्च सन 2024 – 25 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गौरीशंकरच्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूल भक्तवडी( साताररोड )मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून स्कूलचा शैक्षणिक नांवलौकिक उंचाविला आहे.
यामध्ये प्रांजली अनिल दरेकर हिने 93.80% गुण मिळवून स्कूलमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच या स्कूलने गुणवत्तेची परंपरा जोपासत सलग बाराव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे पायल संतोष जाधव 93.60% ,कार्तिकी केशव पंडित 92.60% या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केली आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूलच्या प्राचार्या सविता नलवङे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले.
