गौरीशंकरच्या ङाॅ. पी .व्ही .सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
कलाअविष्कारातून विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकली, उत्कृष्ट सादरीकरणाचे अनोखे दर्शन, विजेत्याना गौरविले..
लिंब – गौरीशंकरचे डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंबचे सन २०२४-२५ चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या कला संस्कृतीचे अनोखे दर्शन पाहण्यासाठी पालकांनी व रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, कॉकटेल डान्स, कोळी नृत्य, राजस्थानी नृत्य ,महाराष्ट्राची लोककलेवर आधारित नृत्य, पंजाबी नृत्य, देशभक्तीपर नृत्याची सादरीकरण केले.
प्रारंभी वार्षिक स्नेहसंमेलन 2025 चे दिपप्रज्वलन व उद्घाटन फिनिक्स अकॅडमीच्या संचालिका सीमा कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, डी फार्मसी चे प्राचार्य विजय राजे, स्कूल चे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, फिनिक्सचे नकुल तिजारे अदि प्रमुख उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून आरोग्य निरोगी राखायचा संदेश दिला त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी धार्मिक सणाचे महत्त्व विशद केले तसेच शारीरिक मानसिक मनोबल उंचावण्यासाठी कराटे व सैनिक प्रशिक्षणाचे महत्त्व याबाबत जनजागृती केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी ढोबळे व अनुष्का कदम हिने केले. प्रास्ताविक प्रीती पवार, शैला शिंदे, यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृतिका साळुंखे, अश्विनी सवाखंडे व इतर.
