माजी आमदार प्रभाकर घार्गे आमदार जयकुमार गोरेचां विजयरथ रोखणार का?
सातारा -(अली मुजावर) माण खटाव विधानसभा मतदारसंघातील हेवीवेट आमदार जयकुमार गोरे माण खटाव मधून चौथ्यादा निवडणूक लढवत आहेत. आमदार जयकुमार गोरेंच्या विकास कामामुळे माण खटाव च्या जनतेच्या हृदयात ते विराजमान आहेत. चौथ्यांदा आमदारकी लढवत असलेले जयकुमार गोरे यांना माजी आमदार प्रभाग घार्गेनीं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून आव्हान दिल्याने सुरुवातीला जयकुमार गोरेंसाठी सोपी वाटणारी निवडणूक आव्हानात्मक झाली आहे.
मला विजयाची शंभर टक्के खात्री आहे. आम्ही सर्वजण सामंजस्याने दोन पावलं मागं येऊन एकत्र आलो आहोत. सर्व नेतेमंडळी, सर्व संघटनांना एकत्र घेऊन या लढाईला सामोरे जाण्यास मी सज्ज झालो आहे. जनतेत महाविकास आघाडीची लाट असून, महाराष्ट्रासह माण-खटाव मध्ये परिवर्तन अटळ असल्याचा प्रभाकर घार्गे साहेबाना आत्मविश्वास आहे.यावेळी रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे यांच्यासह इतर अनेक दिगजांची प्रभाकर घार्गे यांना साथ असणार आहे.
माण खटाव मधील जनतेचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न त्याचबरोबर मतदार संघात औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.उद्योगधंद्यांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी मी घेतोय, असेही त्यांनी म्हटले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी विशेष कार्य केले आहे.ग्रामीण भागातून आलेल्या प्रभाकर घार्गे यांनी सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून बिनविरोध आमदार होण्याची किमया साधली.अर्थकारण,सहकार, राजकारण समाजकारण या सर्वच गोष्टीवर माजी आमदार प्रभाकर घार्गे आघाडीवर असल्याचे दिसून येते.
आपल्या जन्म भूमीत हक्काचा साखर कारखाना असावा हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांना झोपू देत नव्हते. ते पूर्ण करण्यासाठी प्रभाकर घार्गे साहेब, मनोज घोरपडे व संग्राम घोरपडे या तिघांनी पडळ माळरानावर खाजगी साखर कारखाना उभारणी केली. सन २०२१-२२ या वर्षात साखर कारखान्याने या वर्षात विक्रमी आठ लाख ऊसाचे क्रशींग करुन उसाचे व वाहतुकीचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत दिले.
संकट समयी खटाव-माण तालुक्यातील जनतेसाठी प्रभाकर घार्गे सदैव तत्पर असतात. धान्य, पाण्याच्या टाक्या व मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आमदार म्हणून सातारा-सांगली जिल्ह्यात विकास कामे करून दाखवली. यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ पाहिला नाही. तालुक्यात औद्योगिक क्रांती व्हावी. सर्वाना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. त्याशिवाय ग्रामीण भागात प्रगती होणार नाही यासाठी प्रभाकर घार्गे प्रयत्नशील आहेत. माण खटावच्या जनतेचा कौल कोणााला असणार निश्चितच येणाऱ्या कालावधीत दिसून येईल.