Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माजी आमदार मदनदादा भोसले शरद पवार गटात प्रवेश करणार ?

माजी आमदार मदनदादा भोसले शरद पवार गटात प्रवेश करणार ? 

माजी आमदार मदनदादा भोसले शरद पवार गटात प्रवेश करणार ? 

सातारा (अली मुजावर)आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने सातारा जिल्ह्यातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन भोसले यांची भेट घेतली.

मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत,अशी प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. वाई विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मदन भोसले यांचा राजकीय प्रभाव मोठा असून त्यांचे स्वतंत्र केडर आहे. सहकारातील जाणकार म्हणून त्यांची ख्याती आहे. आमदार मकरंद पाटलांना वाई विधानसभा मध्ये सक्षम पर्याय म्हणून माजी आमदार मदन भोसले निर्णय ठरू शकतात. यामुळेच शरद पवार गटाने माजी आमदार मदनदादा भोसले यांची जवळीक वाढली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket