Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » फ्लेमिंगो सूर्याचीवाडीच्या तलावात दाखल

फ्लेमिंगो सूर्याचीवाडीच्या तलावात दाखल

फ्लेमिंगो सूर्याचीवाडीच्या तलावात दाखल

सातारा -पक्षी प्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी ‘पटेरी हंस’हा पक्षी हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास पार करून खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील तलावामध्ये दाखल झाला असून हा ‘पटेरी हंस’ जगातील सर्वात जास्त उंच उडणाऱ्या पक्षांमधील एक पक्षी असून तशी त्याची नोंद आहे.पटेरी हंसाचे व फ्लेमिंगो पायलट सूर्याचीवाडी येथील तलावात आगमन झाले आहे.

या आठवड्यात थंडी चाहूल सुरू झाल्याने हे पटेरी हंस सुर्याचीवाडी तलावात दाखल झाले असून पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्षांचे आगमन झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी सूर्याचीवाडी तलावात दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसातच हे पक्षी मायणी तलावात दाखल होतील. त्यामुळे खटाव तालुक्यासह परिसरातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.

पटेरी हंस, फ्लेमिंगो बरोबरच नाम्या, सुरुची, नकटा, चक्रवाक , शराटी, नदी सूरय, पाणकोंबड्या, चमचचोच्या, राखी बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा, टीबुकली, रंगीत करकोचा, जांभळी पाणकोंबडी, खंडय़ा, करकोचा, तूतवार, तापस तुतारी, आदी पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून “पटेरी राजहंसला” ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे हा पटेरी राजहंस आपले खाद्य तलावाकडील असलेल्या गवतामध्ये शोधतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 70 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket