Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » पर्यावरण दिनाच्या औचित्याने सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेडची पर्यावरण जनजागृती मोहीम

पर्यावरण दिनाच्या औचित्याने सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेडची पर्यावरण जनजागृती मोहीम

पर्यावरण दिनाच्या औचित्याने सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेडची पर्यावरण जनजागृती मोहीम

प्रतिनिधी -पर्यावरण दिनाच्या औचित्याने सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ आणि ‘प्लास्टिकच्या वापरावर शक्य तितका निर्बंध’ या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून विशेष पर्यावरण जनजागृती मोहीम राबवली.या मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वतः ‘यमराज’च्या वेशात एक कर्मचारी चौकाचौकात जाऊन सार्वजनिक संबोधन करत होता. त्याने ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीरतेबाबत माहिती देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

सुप्रीम कंपनी आपल्या कार्यालयात ‘गो ग्रीन’ आणि ‘प्लास्टिकमुक्त कार्यालय’ या संकल्पनांवर आधारित धोरण राबवत आहे. यानुसार, नैसर्गिक झाडांचा वापर, प्लास्टिकविरोधी उपाय आणि पर्यावरणपूरक व्यवहारांची अंमलबजावणी प्राधान्याने केली जात आहे. सर्व कर्मचाऱ्यांना हे धोरण सक्तीने पाळावे लागते.या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे निसर्गाचा सन्मान राखणे, भावी पिढ्यांसाठी पर्यावरण संवर्धन करणे आणि सर्वांनी मिळून जीवनमान उंचावणे होय.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देव तारी त्याला कोण मारी

Post Views: 161 देव तारी त्याला कोण मारी एअर इंडियाचे विमान एआय १७१ गुरुवारी दुपारी विमान कोसळल्यानंतर एकमेव प्रवाशाचे प्राण

Live Cricket