Post Views: 48
रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल १९ रोजी सातारा येथे
सातारा : येथील रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये मणका आजारांवर उपचार करण्यासाठी गुरूवारी, (दि. १९ सप्टेंबर) सातारा येथे दुपारी २ ते ४ या वेळेत तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे प्रसिद्ध रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल हे मणक्याचे फॅक्चर, गादी सरकणे, मणक्याचे ट्युमर आदी आजारांवर उपचार करतील. ज्या रुग्णांना मणक्याचे वेगवेगळे आजार असतील, त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.