आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त “सहकार परीषद २०२५” चे शिर्डी येथे आयोजन – डॉ. रविंद्र भोसले
सहकारी पतसंस्था चळवळीवर जनसामान्यांची विश्वासार्हता वाढावी, पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी महाराष्ट्र शासन सहकार विभाग, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडीट युनियन्स, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी, व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विदयमाने हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष मोठ्या उत्साहाने साजरे करीत आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शिर्डी येथे होणाऱ्या “आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५” च्या पूर्व तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटेसो आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी मंगळवार दि. २१/०१/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सातारा येथे येत आहेत.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक श्री. विनोद कुलकर्णी, श्री. चंद्रकांत वंजारी, श्री. नितीन दोशी, सातारा जिल्हा मध्य. सह. बँक, साताराचे संचालक श्री. रामभाउ लेंभे, सातारा जिल्हा सह. पतसंस्था फेडरेशन, साताराचे अध्यक्ष श्री. अविनाश कदम व संचालक उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्हयातील सर्व सहकारी पतसंस्थांच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी तसेच प्रतिनिधींनी मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता धन्वंतरी नागरी सह पतसंस्थेच्या “धन्वंतरी भवन” ९३, शनिवार पेठ, सातारा (शकुनी गणेश मंदीराजवळ) येथे आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ. रविंद्र भोसले यांनी केले आहे.
