डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगावचे यश
पुसेगाव (नानासाहेब चन्ने)श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला.
फडतरे सिध्दी संभाजी ९४.२० टक्के प्रथम, सावंत अमृता सचिन ९४ टक्के, द्वितीय, साळुंखे सरस्वती सदाशिव ९२.६० टक्के तृतीय दिडके अथर्व शेखर ९१.२० चतुर्थ, जाधव वेदांत गणेश ९०.६० टक्के पाचवा क्रमांक एवढे गुण प्राप्त करून यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव, सर्व संस्था पदाधिकारी, तसेच समस्त पुसेगाव ग्रामस्थ व गुणवत्ता वाढ प्रकल्प पदाधिकारी, शाळेचे प्रशासकीय अधिकारी आणि मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व सहकारी यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
