महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » ठळक बातम्या » आपत्ती व्यवस्थापन किट प्रशिक्षण संपन्न

आपत्ती व्यवस्थापन किट प्रशिक्षण संपन्न

आपत्ती व्यवस्थापन किट प्रशिक्षण संपन्न

सातारा -सातारा जिल्हा पूर प्रवण क्षेत्र असल्याने अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, दरड कोसळणे, भुस्खलन, वादळी वाऱ्यासह मोठ मोठी झाडे उन्मळून पडणे, विजेच्या तारा तुटून शॉर्ट सर्किट होणे, व धोकादायक इमारती कोसळणे, भुकंपाचे हदरे, होर्डिंग्ज कोसळणे किंवा गोठया दुर्घटना किंवा अपघात होणे, वाहतुक बंद होणे अशा प्रकारच्या आपत्तीमुळे जिवित व वित्तहानी होवून या सारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) यांचे मार्फतीने पोलीस स्टेशन, पोलीस चौकी व वाहतुक नियंत्रण शाखा यांना Creative New Tech Ltd. या कंपनीमार्फत ५३ आपत्ती प्रतिसाद किट पुरवठा करण्यात आलेले आहेत.

दि. ०६/०४/२०२६ रोजी पोलीस मल्टीपर्पज हॉल राधिका रोड सातारा या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन साहित्य किट हाताळाणेवावत प्रात्यक्षिक प्रशिक्षण Creative New Tech Ltd. कंपनी, मा. जिल्हाधिकारी सातारा व प्रभारी पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले. सदरचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण Creative New Tech Ltd. कंपनीचे अनुभवी प्रशिक्षक, व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा व अंमलदार सातारा यांचे उपस्थितीत घेणेत आले याकरीता सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपत्ती अथवा अपघात घडल्यानंतर शोध व बचावासाठी आपत्ती साहित्य कसे वापरावे/हाताळावे तसेच याचा उपयोग काय आहे. याबाबत Creative New Tech Ltd. या कंपनीव्दारे सर्व उपस्थितांना प्रोजेक्टर व्दारे प्रात्यक्षिक प्रशिक्षण व्हिडीओ दाखवून मार्गदर्शन केले.

आपत्ती व्यवस्थापन साहित्य किट प्रात्यक्षिक प्रशिक्षण चे आयोजन मा. श्री. संतोष पाटील, जिल्हाधिकारी’ सातारा, मा. डॉ वैशाली कडुकर, प्रभारी पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री देविदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सातारा श्री. राजकुमार भुजवळ पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सातारा, श्रीमती. सुवर्णा काटकर पोलीस उपनिरीक्षक स. फौ. भोकरे, स.फौ. डॉवाळे पो. कॉ. चंद्रकांत जाधव, म.पो.कॉ. राधा जगताप, पो.कॉ. सागर खांडेकर जिविशा (सुरक्षा शाखा) यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket